मातृत्व आधार फाऊंडेशन वतीने उद्योजक राजन कुमठेकर यांचा सत्कार

मालवण

देवबाग येथील निवृत्त सैनिक आणि येथील गावातील मुलांना व्यवसाय उपलब्ध करून काम देण्याकरिता सतत झटणारे राजन कुमठेकर यांचा मुंबई येथे कोकण आयडॉल पुरस्कार विजेते, तारकर्ली, देवबाग, वायरी या पर्यटन प्रभावित भागाचे नाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पर्यटन क्षेत्रात अजरामर करणारे आमचे यशस्वी पर्यटन व्यवसायिक, महालक्ष्मी वॉटर स्पोर्ट्स, महालक्ष्मी ट्रॅव्हल , महालक्ष्मी पर्यटक हाऊस बोट चे सर्वे सर्वा यांचा मुंबई येथे कोकण भूमी प्रतिष्ठान कोकण क्लब यांच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल मालवण येथील सामाजिक कार्य करणारी संस्था मातृत्व आधार फाऊंडेशन या संस्थेचे संचालक माननिय . राजनभाई कुमठेकर यांचे त्यांच्या देवबाग येथील राहत्या घरी जाऊन शाल, श्रीफळ, आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या, प्रसंगी मातृत्व आधारचे संस्थापक, संतोष लुडबे, संचालक दादा वेंगुर्लेकर, देवबाग गावचे तडफदार कार्यकर्ते. सदा तांडेल,ttds चे उपाध्यक्ष. मिलींद झाड, पर्यटन व्यवसायिक बाबा मोरजकर, संदीप लुडबे हे उपस्थित होते.

error: Content is protected !!