योगासना स्पोर्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने “योगासना जिल्हा निवड चाचणी” स्पर्धेचे आयोजन.

कणकवली कॉलेजच्या एच.पी.सी.एल हॉल येथे स्पर्धेचा झाला शुभारंभ.

कणकवली/मयुर ठाकूर.

योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यात योगा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.दिनांक 22 व 23 जुलै 2023 रोजी कणकवली कॉलेज कणकवली येथे योगासन जिल्हा निवड चाचणी स्पर्धा संपन्न होत असून नुकतंच या स्पर्धेचं उद्घाटन कणकवली कॉलेज कणकवली च्या एच.पी.सी.एल हॉल येथे संपन्न झालं.उत्तम आरोग्यासाठी योगा करण्याची प्रत्येकाच्या जीवनात गरज आहे आणि म्हणूनच योगाचा प्रचार प्रसार आणि संपूर्ण जिल्ह्यात योगा क्रांती करण्याचं कार्य ही संस्था गेले कित्येक वर्ष करीत आहेत. योगासन चाचणी स्पर्धा ही राज्यस्तरीय स्पर्धा असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित केली जाते.सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट योगासना स्पोर्ट असोसिएशन च्या माध्यमातून या स्पर्धेचा शुभारंभ झाला.या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच कणकवली कॉलेज कणकवली चे सेक्रेटरी श्री विजय वळंजु,डॉ.विद्याधर तायशेटे कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ.युवराज महालिंगे,विद्यामंदिर हायस्कूल कणकवली चे प्रिन्सिपल पी.जे कांबळे,पुढारी आवृत्तीप्रमुख श्री गणेश शेटे,योगासना स्पोर्ट असोसिएशन सिंधुदुर्गच्या अध्यक्षा डॉ. सौ वसुधा मोरे,तसेच सिक्रेटरी डॉ तुळशीदास रावराणे आणि संस्थेचे सदस्य रावजी परब,श्वेता गावडे, डॉ कोरगावकर,प्रकाश कोचरेकर,संजय भोसले,तसेच आरोग्य विस्तार अधिकारी योगशिक्षक रवींद्र पावसकर,सह प्रभारी आनंद परब, श्वेता सावंत,सौ केळुसकर,सौ शिरसाट,कु तेजल कुडतरकर,कु प्रियंका सुतार तसेच योगा चाचणी स्पर्धेत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी- पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!