आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्यात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आणखीन बळ देण्यासाठी एन.डी.आर.एफ, एस.डी.आर.एफची टीम गोव्यातून मागवण्यासंदर्भातील शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना
सावंतवाडी : आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्यात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आणखीन बळ देण्यासाठी एन.डी.आर.एफ, एस.डी.आर.एफची टीम गोव्यातून मागवण्यासंदर्भातील सुचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना केली असून त्यांनी तशी मागणी केल्यावर तातडीनं राज्यसरकारच्या माध्यमातून त्या टीमची पूर्तता जिल्ह्यासाठी केली जाईल. अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
नगरपालिका कार्यालय सावंतवाडी येथे शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत जनतेच्या अपेक्षा सरकार आणि प्रशासनाकडून असतात. त्यामुळे कुणाचा जीव जाऊ देऊ नका,लोकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करा अशा सुचना दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, सीओ प्रजित नायर,पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, डीएओ नवकिशोर रेड्डी यांसह जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करत आढावा घेण्यात आला.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहिती नुसार जिल्ह्यात 23 जुलै ते 27 जुलै या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट
हवामान विभागामार्फत देण्यात आलेला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान
विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी इर्शाळवाडी येथील घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, सीओ प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक एस.
नवकिशोर रेड्डी, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पोलिस निरीक्षक त्रचषिकेश अधिकारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता, देवधर मध्यम पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता, सिंधुदूर्ग पाटबंधारे प्रकल्प, बांधकाम विभाग,सावंतवाडी, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिंधुदूर्ग व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.