पुराच्या पाण्यात अडकलेल्या तुळस येतील परब नामक युवकाला काढले सुखरूप बाहेर

दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले

साडेतीन तास झाडावरच बसला युवक

मांतोड येतील ग्रामस्थ यांनी वाचवले प्राण

सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड- होडावडा पुलानजीकच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या तुळस येथील तरुणाला मातोंड ग्रामस्थ यांनी वाचविले, दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण अखेर वाचले पुराच्या पाण्यात त्यांची मोटर सायकल माञ वाहून गेली, पुराचे पाणी मांतोंड होडावडे रस्त्यावर आले होते त्यातून मार्ग काढत असताना त्यांची मोटर सायकल पाण्याच्या प्रवाहात तो पणं वाहून गेला अखेर त्यानें वाहत जात असताना झाडाला पकडले त्यामुळें त्याचे प्राण वाचले.तो आरडा ओरड करत असताना मातोड येतील ग्रामस्थ यांनी त्यांचा आवाज ऐकला कोण तरी पुराच्या पाण्यात अडकला असे समजले त्यांनी पाहिले तर एक तरुण पुराच्या पाण्यात अडकला रात्रीची वेळ होती तरी काही तरुणांनी धाडस दाखवत रस्सी व अन्य सामान याच्या सांह्याने त्यांचे प्राण वाचवले व त्याला पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर आणले. ही घटना रात्री मध्य रात्री घडली रात्री 12, वाजता या तरुणास वाचविण्याास यश आले. तुळस व मांतोड येतील ग्रामस्थ गोळा झाले पण पाणी एवढे वाढले होते की त्यांच्या परुत जाणें कठीण होते शेवटी मांतोड येतील ग्रामस्थ यांनी धाडस दाखवत परब नामक युवकां जवळ पोहचले व रसि च्या साह्याने त्याला बाहेर काढलं.

ह्या तुळस येतील तरुणाचे नावं सिद्धेश शिवराम परब वय 37 असे आहे. याला वाचविण्यासाठी ग्रामस्थ यांनी मोलाचं काम केले. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. याकरता मोलाचे काम मांतोंड येथील होमगार्ड समादेशक अधिकारी संतोष विष्णू मातोंडकर, ग्रामस्थ ज्ञानेश्वर मोहिते, कृष्णकांत घोगळे, विशाल घोगळे, अनिकेत जोशी, राहुल प्रभू, गिरीश प्रभू, सौरभ घोगळे, सुहास घोगळे, बाळा मोहिते यांनी कंबरे पर्यंत पाण्यात जाऊन जाड दोराच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले. ८ फुट उंचीवर झाडावर हा तरुण सुमारे ३ ते ४ तास अडकून होता. खाली पुरुषभर एवढे पाणी व पाण्याचा शेतातून नदीच्या दिशेने जाणारा झोत होता. अशा स्थितीत या तरुणाला सुखरूप बाहेर काढणाऱ्या ग्रामस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे . ही घटना समजतात पोलीस कर्मचारी रात्री घटनास्थळी दखल झाले.

error: Content is protected !!