कणकवली नगरपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सुशांत नाईक यांची आमदार नितेश राणे यांच्यावर टीका
भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर यांची टीका
कणकवलीत फिरण्या पेक्षा स्वतःचा भाऊ आमदार असलेल्या कुडाळ मालवण मध्ये फिरून परिस्थिती जाणून घ्यावी
शिवसेना माजी नगरसेवक सुशांत नाईक यांनी कणकवली नगरपंचायत डोळ्यासमोर ठेवूनच आमदार नितेश राणे साहेबांवर टीका केली. आपल्या आमदार भावाकडून ठेकेदारांकडून हप्ते वसुली व अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग याची बाळकडू घेतल्यामुळे दुसरे मतदारसंघातील आमदार असाच असतो या गोड गैरसमजातून सुशांत नाईक यांनी आमदारांवर टीका केली आहे. असे प्रसिद्धी पत्रक भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस गणेश ज
तळगावकर यांनी दिलेले आहे.
आमदार नितेश राणे हे महाराष्ट्राचे कर्तुत्ववान व लोकप्रिय आमदार आहेत. कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील काही समस्या तत्काळ सोडवण्यासाठी त्यांनी झटपट कार्यपद्धती अवलंबिवली आणि त्याचे जनतेत कौतुकही झाले परंतु मुळात पोटशूळ असल्यामुळे अशा प्रकारची टीका सुशांत नाईक यांनी केली
सुशांत नाईक यांच्या कणकवली शहरात अनेक अनधिकृत इमारती आहेत त्यामुळे भविष्यात त्यावरील कारवाई थांबवण्यासाठी त्यांना कणकवली नगरपंचायती त सत्ताधारी होण्यात प्रचंड रस आहे त्यामुळेच अशा प्रकारची वायफळ बडबड करून हा बालिश प्रयोग करायचा असे त्यांनी मनोमनी ठरविले आहे.
यापुढे सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर कोणत्याही प्रकारची बालिश टीका केल्यास त्यांच्या अनधिकृत कामाची कुंडली जनतेसमोर मांडू असा इशारा भारतीय जनता पार्टी मार्फत आम्ही देत आहोत. असे श्री तळगावकर यांनी म्हटले आहे
कणकवली प्रतिनिधी