महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवण या संघटनेचा 61 वा वर्धापन दिन 22जुलै रोजी कट्टा येथे संपन्न होत आहे
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकसमिती तालुका शाखा मालवणच्या वतीने शनिवार दि.22.07.2023 रोजी संघटनेच्या 61व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
संघटनेच्यावतीने विद्यार्थी, शिक्षक, व समाज हिताचे विविध उपक्रम राबविलेे जातात यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा मालवण व वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविदयालय (संयुक्त ) कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने वराडकर हायस्कुल कट्टा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे . तसेच संघटनेच्या वतीने कट्टा नं १ या शाळेत वृक्षारोपण व अन्य तालुक्यातून मालवण तालुक्यात बदलीनेआलेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात येणार आहे तरी या सर्व उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष श्री सुयोग धामापूरकर व तालुकासचिव श्री जीवन हजारे यांनी केले आहे.
संतोष हिवाळेकर / पोईप