नवीन आंबेरी पुलावरून बसेस व अन्य वाहाने सुरू करा

उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांची मागणी

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून आंबेरी पूल पूर्ण

प्रतिनिधी । कुडाळ : आमदार वैभव नाईक यांनी माणगाव खोऱ्यातील जनतेला दिलेला शब्द पुर्ण केला असुन आपत्कालीन व्यवस्था म्हणून माणगाव आंबेरी नविन पुलावरुन एस टी बसेस व अन्य वाहाने सुरु करा अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांनी कुडाळचे तहसिलदार अमोल पाठक यांच्या कडे केली आहे.
यावेळी श्री धुरी म्हणाले, गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे माणगाव खोऱ्यातील किमान सत्ताविस गावांचा संपर्क तुटलेला असुन माणगाव खोऱ्यातील जनतेच्या मागणीनुसार आमदार वैभव नाईक यांनी आंबेरी नविन पुल बांधुन पुर्ण केले. सध्या छोट्या पुलावर पाणी आल्याने वाहातुक बंद आहे. म्हणून आपत्कालीन व्यवस्था म्हणून नविन पुलावरुन वाहातुक सुरु करावी अशी मागणी श्री धुरी यांनी तहसिलदार श्री पाठक यांच्या कडे केली आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!