सिंधुदुर्ग भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत
कोकणाचे वृत्त तंतोतंत खरे ठरले
भाजपाच्या अनेक पदांवर केले आहे प्रभाकर सावंत यांनी काम
गेली तीन वर्षाहून अधिक काळ भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत राहणाऱ्या माजी आमदार राजन तेली यांचा पक्षीय धोरणानुसार जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाकरिता अखेर कोकण नाऊ ने दिलेल्या सर्वप्रथम दिलेल्या वृत्तनुसार प्रभाकर सावंत यांची निवड झाली आहे. कोकण नाऊच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी प्रभाकर सावंत हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष होणार. याबाबत बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. भाजपाकडून याला दुजोरा देण्यात आला नसला तरी जिल्ह्यात काही अन्य नावे चर्चेत असताना प्रभाकर सावंत यांच्या नावावर जवळपास शिक्का मोर्तब झाल्याचे निश्चित होते. मात्र त्यानंतर काही महिने वेट अँड वॉच च्या भूमिकेत भाजपाची नेतेमंडळी राहिली असताना आता राज्यस्तरावरून भाजपाच्या जिल्हाध्यक्षांची नावे प्रसिद्ध करण्यात आली. व त्यात प्रभाकर सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने कोकण नाऊ चे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. प्रभाकर सावंत भाजपाच्या जुन्या फळीतील निष्ठावंत कार्यकर्ते असून भाजपाच्या अनेक पदांवर त्यांनी आतापर्यंत काम केले आहे. भाजपाच्या पक्ष शिस्त ला महत्त्व देत असताना भाजपाची ध्येय धोरणे व भाजपाने दिलेले पक्षीय कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यात ते नेहमी सक्रिय असतात. लोकसभा प्रवास योजनेत माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासोबत त्यांनी केलेले काम पक्षीय पातळीवर दखल घेण्यात आले होते. नवीन व जुनी भाजपा यामध्ये समन्वय साधत सर्वांना सोबत घेऊन चालणारे पदाधिकारी अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीमुळे आता जिल्ह्यातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली