विद्यामंदिर कणकवली प्रशालेत राबवीला “बांधावरची शाळा” उपक्रम
कणकवली/मयुर ठाकूर
पर्यावरण सेवा योजना आणि हरित सेना विभागामार्फत परबवाडी येथील श्री भीमा परब यांच्या शेतामध्ये बांधावरची शाळा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमात विद्यार्थ्यांना शेती विषयी माहिती देण्यात आली. पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती कशी करतात याची माहिती दिली .व प्रत्यक्ष शेतात उतरून भात लावणीचा अनुभव दिला.शेळके सर आणि शिरसाट मॅडम यांनी भाताची लावणी कशी करतात याचे प्रात्यक्षिक दाखविले.सर्व विद्यार्थ्यांनी अगदी आनंदाने शेतीच्या कामात सहभाग घेऊन मनमुराद आनंद लुटला. हा उपक्रम श्री जनार्दन शेळके, श्री प्रसाद राणे, सौ विद्या शिरसाट व श्री लीलाधर परब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सन्मा. श्री कांबळे सर, पर्यवेक्षिका सन्मा. सौ. जाधव मॅडम, ज्येष्ठ शिक्षक सन्मा. श्री वनवे सर व सन्मा. श्री तवटे सर यांनी उपक्रम स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन मुलांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी पर्यवेक्षिका सौ.जाधव मॅडम यांनी सुद्धा भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.