कुडासे पालक-शिक्षक उपाध्यक्षपदी पूजा देसाई

कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर प्रशालेच्या पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी पूजा दत्ताप्रसाद देसाई यांची निवड करण्यात आली. मेळावा उत्साहात झाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस.एस.परब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी कुडासे सरपंच पूजा बाळाजी देसाई,शालेय समिती सदस्य प्रकाश कुडासकर,कुडासे ग्रामपंचायत सदस्य राजाराम देसाई,प्रसाद कुडासकर,माजी उपाध्यक्ष बाबाजी (दादा) देसाई यांच्यासह पालक शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ सालासाठी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी सौ.पूजा दत्तप्रसाद देसाई यांची सर्वामते निवड करण्यात आली यावेळी कार्यकारणीची ही निवड करण्यात आली
मुख्याध्यापिका एस.एस.परब यांनी मार्गदर्शन मनोगत व्यक्त केले यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परिक्षा जीवनात खूप महत्वाची आहे विद्यार्थाचा कल आणि गुणवत्ता बघून निर्णय घेणे आवश्यक आहे शिक्षण पध्दतीत अमलाग्र बदल होत आहेत मूल्यमापन पध्दती बदलत आहेत याची जाणीव ठेवून पालकांनी आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे असे सांगितले सूत्रसंचालन जे.बी.शेंडगे सर यांनी केले तर आभार एस.व्ही.देसाई यांनी मानले.

दोडामार्ग l प्रतिनिधी

error: Content is protected !!