विवेक पूर्ण मतदान; कणकवलीत आज परिसंवाद

कणकवली : भारतीय लोकशाही समाज महासंघाच्या वतीने आज कणकवली मध्ये विवेक पूर्ण मताधिकार हाच राजकीय सामाजिक आर्थिक न्यायाचे साधन आहे या महत्वपूर्ण विषयावर आज कणकवली मध्ये विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे
आज रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते सहा या वेळात गोपुरी आश्रम सभागृह नाईक पेट्रोल पंपाच्या मागे येथे आयोजित करण्यात आला आहे
अभिनेते आणि लोकशाहीवादी कार्यकर्ते निलेश पवार यांनी ही माहिती दिली
भारतीय लोकशाही समाज महासंघाचे राष्ट्रीय संयोजक एडवोकेट रावसाहेब मोहन यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद होणार आहे या परिसरामध्ये गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा डॉक्टर राजेंद्र मुंबईकर ., भारतीय लोकशाही समाज महासंघाचे अध्यक्षआयु .अभिषेक पवार
संयोजक सूर्यकांत कदम आदी मान्यवर सहभागी होणार आहेत
आज जगामध्ये लोकशाही व्यवस्था हीच सर्वोत्तम मानवी सह जीवनाची प्रणाली मांडली गेलेली गेलेली आहे स्वातंत्र्य समता न्याय बंधुता समानहक्क आदितत्त्वांचा पुरस्कार करणाऱ्या लोकशाही मूल्यांचा प्रवास हा फुले आंबेडकर मार्गानेच यशस्वीपणे होऊ शकतो विवेक पूर्ण मताधिकाराचा उपयोग हेच सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचे साधन आहे या मुद्द्यावर या परिसंवादामध्ये चर्चा होणार आहे
तरी लोकशाही प्रेमी जनतेने या परिसंवादास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन बाळू मेस्त्री विकास तांबे श्रद्धा कदम यांनी केले आहे

सीतराज परब / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!