ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मंदार काणे यांची निवड

जिल्हा उपाध्यक्ष म्हणून किशोर राणे आणि जिल्हा सचिवपदी – अर्जून परब यांची निवड
सिंधुदुर्ग : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मंदार काणे यांची तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून किशोर राणे आणि जिल्हा सचिवपदी – अर्जून परब यांची निवड करण्यात आली आहे.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नव्याने निवड करण्यात आलेल्या मंदार काणे यांनी यापूर्वी संघटनेमध्ये जिल्हा संघटक म्हणून केलेली सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्यावरती यावेळी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.तसेच संघटनेच्या कार्यात सक्रिय राहून संघटनेसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्रियाशील पदाधिकारी व सदस्यांना नवीन जबाबदारी देऊन संधी दिली आहे.जेणे करुन संघटना वाढीसाठी योगदान देणाऱ्याचा खरा कस लागणार आहे.त्याचबरोबर संघटनेच्या माध्यमातून केलेले कार्य प्रत्येकापर्यंत सोईस्करित्या पोहचविण्यास मदत होईल.तसेच संघटना वाढीसाठी नवनवीन संकल्पना व उपक्रम हाती घेणे आवश्यक असून त्यामुळे संघटनेची व्याप्ती वाढवण्यासाठी मदत होईल.
राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कटारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर तसेच महाराष्ट्र राज्य सचिव राकेश शिंदे व राज्य निरीक्षक घन:श्याम सांडीम यांच्या मार्गदर्शना नुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे.
संघटनेची नवीन जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे:-
जिल्हाध्यक्ष मंदार काणे- (पडेल, तालुका देवगड)
जिल्हा उपाध्यक्ष- किशोर राणे -(हडपीड, तालुका देवगड)
जिल्हा सचिव – अर्जून परब-(माळगांव, तालुका मालवण),
जिल्हा महिला संघटक -सौ.मिलन पार्टे – (कट्टा-नांदोस, तालुका मालवण),
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख – संजय खानविलकर -(तळेरे, तालुका कणकवली),
जिल्हा संघटक- डॉ.वैभव आईर- (ओरोस-सिंधुदुर्गनगरी, तालुका कुडाळ),
जिल्हा महिला संघटक- सौ.शिवानी पाटकर (सावंतवाडी शहर, तालुका सावंतवाडी) अशी जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्नावरती व समस्यांबाबत आवाज उठवून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.त्याच बरोबर जिल्हा व सर्व तालुका संघटना यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून संघटना वाढीचा विस्तार अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा विश्वास संघटनेचे नुतन जिल्हाध्यक्ष मंदार काणे यांनी व्यक्त केला.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / सिंधुदुर्ग