मुख्यमंत्र्यांचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्याकडून सिंधुदुर्गात स्वागत
कणकवली तालुकाप्रमुख भूषण परूळेकर यांनी देखील केले स्वागत
सिंधुदुर्ग : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंगणेवाडी येथे भराडी देवीच्या दर्शनासाठी सिंधुदुर्गात उपस्थिती दर्शवली असताना मालवण चिवला बीच नजीक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निलरत्न बंगल्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी भेट देत नारायण राणेंची चर्चा केली. याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, तालुकाप्रमुख भूषण परूळेकर यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. कणकवली तालुकाप्रमुख भूषण परूळेकर यांच्याकडून देखील मुख्यमंत्रींनी स्वतंत्र स्वागत स्वीकारले. याप्रसंगी कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, दत्ता सामंत, आमदार कालिदास कोळंबकर, रवींद्र फाटक यांच्यासह अनेक पदाधिकारी व नेते उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / सिंधुदुर्ग