जानवली रतांबीव्हाळ येथे अपघातात चौघे जखमी

यामाहा दुचाकीस्वाराने मागाहुन दुसऱ्या दुचाकीला दिली धडक

वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल

कणकवलीहून हुबरट येथे जात असणाऱ्या दुचाकीला मागाहुन वैभववाडीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने यात चौघेजण जखमी झाले. यातील वैभववाडी उंबर्डेकडे जाणाऱ्या यामाहा दुचाकी वर मागे बसलेली युवती डोक्याला मार लागत गंभीर जखमी झाली तर उर्वरित तिघांना जबर दुखापत झाली आहे. हा अपघात जानवली रतांबी व्हाळ या दरम्यान आज दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळतात वाहतूक पोलीस प्रकाश गवस व संदेश आबीटकर दोघेही घटनास्थळी तात्काळ दाखल होत महामार्गावर पडलेली वाहने बाजूला केली. याबाबत उपलब्ध माहितीनुसार सचिन होळकर व शेखर होळकर हे आपल्या दुचाकी ने हुबरट च्या दिशेने जात होते. तर याच दरम्यान यामाहा च्या नवीन मोटरसायकल ने दोघेजण वैभववाडी उंबर्डे च्या दिशेने जात होते. यातील यामाहा दुचाकी स्वराने पुढे जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत जवळपास 50 फूट दोघेही महामार्गावरून घसरत पुढे गेले. तर यामाहा दुचाकी वर मागे बसलेल्या युतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या दोन्ही मोटरसायकलचे नुकसान झाले असून, घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस प्रकाश व संदेश आबिटकर तात्काळ दाखल झाले. जखमींना उपचाराकरिता कणकवलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती श्री गवस यांनी दिली.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!