भव्य कोकण आयडॉल सन्मान सोहळा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोकणात गावागावात असामान्य काम करणाऱ्या 75 व्यक्तिमत्त्वांचा कोकण आयडॉल पुरस्कार देऊन सन्मान..
कोकणातील नैसर्गिक साधन संपत्तीच्या विकासातूनच कोकणचा शाश्वत विकास होईल !
या प्रक्रियेत लोक चळवळ लोकसहभाग ,कोकणवासियांचा सक्रिय सहभाग सर्वात महत्त्वाचा. कोकण भूमी प्रतिष्ठान, ग्लोबल कोकण या चळवळीचा वर्धापन दिन. गेली 23 वर्ष सातत्याने कोकणच्या शाश्वत विकासाची चळवळ केल्यानंतर 16 जुलै २०२३ दुसऱ्या तपपूर्ती दिशेने ही संस्था प्रवास करत आहे. यानिमित्ताने एक अभिनव कार्यक्रम आयोजित केला आहे. कोकणच्या पुढच्या दहा वर्षाचा विकासाचा वेध घेणारी कोकण व्हिजन 2030 ही परिषद व भव्य कोकण आयडॉल सन्मान सोहळा या निमित्ताने आयोजित केला आहे. कोकणात गावागावात काम करणाऱ्या 75 असामान्य व्यक्तिमत्त्वांचा, भगीरथांचा सन्मान करणारा भव्य कोकण आयडॉल सन्मान सोहळा यावेळी आयोजित केला आहे. आधुनिक शेती ,मत्स्य व्यवसाय पर्यटन, निसर्ग पूरक उद्योग कोकणच्या शाश्वत विकासाचे उद्योग गावागावात सुरू आहेत. जे कोकणात राहून दोनशे / पाचशे तरुणांना रोजगार देत आहेत, उदरनिर्वाहाची साधने निर्माण करत आहेत, स्वतःच्या उद्योग विकासाबरोबरच आजूबाजूच्या परिसराचा , पर्याययाने कोकणचा विकास करत आहेत अशा अतिशय यशस्वी उद्योजकांची / सामाजिक कार्यकर्त्यांची निवड या पुरस्काराकरता केली आहे. भविष्यात या कोकण आयडॉलचे अनुकरण व्हावे , यातून प्रेरणा घेऊन कोकणवासीयांनी / युवकांनी कोकणात हजारो प्रकल्प उभारावेत याकरिता कोकण क्लब / कोकण बिझनेस फोरम या संस्था काम करत आहेत.
भविष्यातील कोकण विकासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री , उद्योग मंत्री उदयजी सामंत , छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील
तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजी राजे भोसले छत्रपती, आमदार प्रसादजी लाड, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे, लोकमान्य टिळकांचे वंशज कुणालजी टिळक, राज्याचे माजी मुख्य सचिव द म सुकथनकर आणि अनेक मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार आहे. रविवार दिनांक 16 जुलै संध्याकाळी ३ ते रात्री ९
बी एन वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी, राजा शिवाजी विद्यालय, दादर पूर्व येथे हा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे.
नर्सरी उद्योगातून शेकडो कोटीची एका पंचक्रोशीची आणि गव्हे गावाची अर्थव्यवस्था उभारणारे दापोली तालुक्यातील अरविंद अमृते, स्वतः बरोबरच कोकणात शंभरहून अधिक कृषी पर्यटन उभारण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारे प्रभाकर सावे, कुंडलिका नदी पर्यटनातून 500 हून अधिक तरुणांसाठी रोजगार मिळवून देणारा महेश सानप, हजारो विद्यार्थ्यांना पर्यटन उद्योगाचे प्रशिक्षण देणारे रिगल कॉलेजचे संजय शिर्के, देशातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बांबू उद्योग विकसित करणारे कॉनबॅकचे संजीव करपे, लंडनमध्ये राहणारा आणि कोकणातील आंबा युरोप आणि कॅनडामध्ये विक्री करणारा चिपळूणचा युवक सचिन कदम, दररोज वीस हजार लिटर दुधाचे संकलन करणारे व डेरी उद्योग यशस्वी करणारे खेड मधील संतोष शिर्के अशा 75 असामान्य व्यक्तिमत्त्वांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.
कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे निमंत्रितांसाठी हा कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण कोकणातून 800 उद्योजक , व सन्माननीय व्यक्तिमत्व या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
सहभागी होण्यासाठी अधिक माहितीसाठी
संपर्क +91 98212 50762 /. +91 97689 7464. असा. आहे





