कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न

कळसुली शिक्षण संघ मुंबईच्या कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशालेमध्ये दिनांक 6 जुलै 2023 रोजी योजनांचा जागर हा विविध योजनांच्या माहिती देणारा कार्यक्रम शाळेमध्ये राबविण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान कळसुली शिक्षण संघाचे स्कूल कमिटी सचिव श्री के आर दळवी यांनी भूषविले तर प्रमुख उपस्थित यामध्ये श्री नामदेव घाडीगावकर – स्कूल कमिटी व्हाईस चेअरमन,श्री अंकुश परब- कळसुली शिक्षण संघ मुंबई कार्यकारिणी सदस्य माननीय मुख्याध्यापक श्री वगरे व्ही.व्ही.,ज्येष्ठ शिक्षक श्री सावळ एस के, शिक्षक पालक संघाचे माजी उपाध्यक्ष श्री. शिवाजी साबाजी गुरव, इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
याप्रसंगी शिक्षक पालक संघाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. इयत्ता पाचवी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या कळसुली दशक्रोशीतून पालक संघ निवडण्यात आला.
प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक श्री व्ही.व्ही.वगरे यांनी शिक्षक-पालक संघाची उद्दिष्टे व महत्व विशद केले त्याचप्रमाणे शिक्षक पालक संघाचे कार्य आणि शालेय उपक्रमामध्ये सहभाग याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रशालेमध्ये योजनांचा जागर या कार्यक्रमांतर्गत शाळेत विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना जसे इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, अल्पसंख्यांक मुलीसाठी हजरत बेगम महल शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, धार्मिक अल्पसंख्यांक मुला-मुलींसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी एन एम एम एस यासारख्या विविध शिष्यवृत्ती योजना प्रशालेमध्ये असून त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी या योजनांची सविस्तर माहिती यावेळी समस्त पालक वर्गांना देण्यात आली त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व शिष्यवृत्तीची रक्कम याबाबत पालकांना अवगत करण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये शिक्षक पालक संघ आणि शाला व्यवस्थापन समिती सदस्यांची कार्यकारणी निवडण्यात आली.
शिक्षक पालक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.वगरे व्ही.व्ही तर उपाध्यक्ष श्री जयवंत सुरबा घाडीगावकर तर सचिव म्हणून शिक्षकांमधून श्री पालव बी. आर. यांची उपसचिव सौ प्रियांका पंढरी देसाई तर सदस्य श्री धाकू लवू घाडीगावकर, श्री रणजीत रघुनाथ सुतार श्री दीपक रामचंद्र राणे श्रीम. शारदा अनंत सावंत श्री प्रभाकर जगन्नाथ दळवी श्री.सुभाष भास्कर नाईक सौ. सुकन्या सुमंगल कदम इत्यादीची नवीन कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. शिवाजी साबाजी गुरव तर उपाध्यक्ष श्री. पांडुरंग यशवंत सावंत सचिव – प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वगरे व्ही.व्ही शिक्षकांमधून सदस्य श्री. सावळ एस के शिक्षण तज्ञ म्हणून श्री. नीलकंठ महादेव मुंडले स्थानिक प्राधिकरण अधिकारी श्री. रविकांत हनुमंत दळवी त्याचप्रमाणे श्री. शिवप्रसाद आत्माराम घाडीगावकर श्री. शंकर अनंत गावकर श्री. सिताराम शिवराम मेस्त्री श्री. गणेश राजाराम पाडावे, श्री राजेश विजय भोगले, सौ. श्वेता श्रीकृष्ण दळवी सौ.स्मिता विनायक भोसले इत्यादींची नेमणूक करण्यात आली याप्रसंगी मार्गदर्शन करताना स्कूल कमिटी चेअरमन श्री के.आर. दळवी यांनी समस्त पालक वर्गाला प्रशालेच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली नवीन कार्यकारणीला शुभेच्छा देत मागील कार्यकारिणीचे चांगल्या कार्यासाठी आणि सहकार्यासाठी आभार व्यक्त केले.
या सभेचे सूत्रसंचालन आणि सांगता माजी सचिव श्री परुळेकर एस. ए. यांनी आभार व्यक्त करून केली.
कणकवली प्रतिनिधी