आजगाव माळ्यारवाडी वेश्याव्यवसाय प्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

वेंगुर्ला
आजगाव माळ्यारवाडी येथे अन्नपुर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर फौंडेशन या संस्थेच्या नावाखाली महिला / मुली यांना आणून वेश्याव्यवसाय करीत असल्याबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित संतोष मधुकर लुडबे (वय ५१ वर्षे) रा. आजगांव, माळयारवाडी, ता. सावंतवाडी, याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे,अशी माहिती वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली. वेंगुर्ला पोलीस पथक व स्था. गु. अ. शा पोलीस निरीक्षक सिंधुदुर्ग व त्यांचे पथक यांनी आजगाव येथे ७ जुलै रोजी ही कारवाई करून संबंधितास ताब्यात घेत भा. द. वि. कलम ३७० सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५९ कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर छाप्यादरम्यान तीन महिला मिळून आल्याने त्यांना महिला अंकुर केंद्र सावंतवाडी येथे ठेवण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पीएसआय दाभोलकर, सपोफो कुबल, पोहेकॉ. वेंगुर्लेकर, पोहेकॉ. पाटील, मपोहेकॉ. चौहान, पोहेकॉ. सराफदार, पोहेकॉ. राऊळ, पोहेकॉ. परब, पोकॉ. सावंत, पोकॉ. कांडर, पोकॉ. खडपकर, मपोकॉ. भाटे, व स्था. गु. अ. शा पोलीस निरीक्षक सिंधुदुर्ग व त्यांचे पथक पीएसआय शेळके, सपोफौ. कोयंडे, पोहवा. केसरकर, पोहवा. काळसेकर, पोहवा. कदम, पोलीस कॉन्स्टेबल सरमळकर या पथकाने केली होती.






