ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा कणकवलीच्या मासिक बैठकीचे आयोजन
ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा कणकवली ची मासिक बैठकीचे शुक्रवार दि १४ जुलै रोजी सायंकाळी ४.०० वाजता जेष्ठ नागरिक सेवा संघ कार्यालय , बॅडमिंटन हाॅल , नगर पालिकेजवळ कणकवली येथे संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.एस एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा संघटक मा. सिताराम कुडतरकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. सभेमध्ये संघटनेच्या विविध विषयांवर विचार विनिमय करून पुढील कामकजाविषयी कार्यवाही व नियोजन करावयाचे आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्येकर्ते ,हीतचिंतकानी व ज्यांना ग्राहक चळवळींत व तालुका शाखा कणकवली च्या कार्य कारणीमध्ये सहभागी होऊ इच्छिता .किंवा आवड आहे. त्या सर्वानी या सभेस उपस्थित रहावे. असे आवाहन कणकवली तालुका अध्यक्षा श्रद्धा सूर्यकांत कदम व सचिव पूजा प्रकाश सावंत यांनी केले आहे.
कणकवली प्रतिनिधी