सातार्डा भटपावणीवाडी येथील साकव तुटल्याने ग्रामस्थांचा संपर्क तुटला
ग्रामस्थांची प्रशासनाविरोधात नाराजी
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा भटपावणीवाडी येथे जाणाऱ्या साकवावर झाड पडून हा साकव तुटून गेला त्यामुळे भटपावणीवाडीचा संपर्क पूर्णतः तुटला असून हा साकव तात्काळ करावा म्हणून ग्रामस्थांनी मागणी केली आहे मात्र याकडे प्रशासनाने अद्याप कोणत्याही प्रकारचा लक्ष दिलेला नाही प्रशासनाच्या या कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा भटपावणीवाडी येथे जाणारा एकच मार्ग आहे आणि हा मार्ग म्हणजे साकव. पहिल्याच पावसामध्ये या साकवावर झाड पडून साकव तुटून पडला आहे भटपावणीवाडी तील १० ते १२ घरातील ग्रामस्थ या मार्गाने ये – जा करतात शाळेत जाणारे विद्यार्थी याच मार्गाने येतात तसेच नोकरीनिमित्त बाहेर असणारे ग्रामस्थ या मार्गाचा वापर करतात. मात्र हा साकव तुटून पडल्यामुळे गेले काही दिवस या ग्रामस्थांचा मार्ग बंद झाला आहे. त्यांना ये- जा करणे कठीण झाले आहे एखादा रुग्ण वाडीत झाला तर त्याला डॉक्टर पर्यंत घेऊन येणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत हे ग्रामस्थ राहत असताना ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत हा साकव लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे मात्र या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक बघितलेलं नाही प्रशासनाच्या या कारभाराविरोधात ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केले जात आहे. या ग्रामस्थांना साकव दुरूस्ती करून देऊन त्यांचा मार्ग सुरू करावा अशी मागणी होत आहे. साकव तुटल्यापासून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाले आहे याकडे प्रशासन लक्ष देणार काय? असा सवाल सातार्डा भटपावणीवाडी येथील ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे.