बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथेगुणवंतांचा सत्कार
![](https://kokannow.in/wp-content/uploads/2023/07/WhatsApp-Image-2023-07-10-at-3.08.10-PM.jpeg)
कट्टा दशक्रोशीतील हायस्कूल मधील १० वी १२वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ध्यास फाऊंडेशनचे संस्थापक सुरेश चव्हाण सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.
प्रमुख मार्गदर्शक सायली चव्हाण यानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्व विकास, इंग्रजीतून संवाद कौशल्य, चतुरस्त्र वाचन पुढील शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असून विद्यार्थ्यानी त्याचा अंगिकार करून आपल्यातील गुण विकसित करावे व स्पर्धात्मक परीक्षेसाठी सदैव तयार राहावे असे मार्गदर्शन त्यानी केले.
रोटरीयन रश्मी पाटील यानी आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगून त्यावर कशी मात केली याची उदाहरणे मुलाना दिली जिदद् अभ्यास व मेहनत घेऊन मुलानी आपली गुणवत्ता टिकवून ठेवावी असं आवाहन त्यानी विद्यार्थ्याना केले. किशोर शिरोडकर यानी इंग्रजीचे ज्ञान अगदी पहिली पासून वेगळ्या पद्धतीने मुलाना शिकवणे आवश्यक असून त्या साठी पालकाना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता विशद केली. आकेरकर सर यानी ही विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात दीपक भोगटे यानी सेवांगण च्या उपक्रमाची माहिती दिली. बाळकृष्ण नांदोसकर व वैष्णवी लाड यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले सुजाता पावसकर व बाळकृष्ण गोंधळी यानी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
यावेळी वराडकर हायस्कूल कट्टा व कनिष्ठ महाविद्यालय वराडकर इंगलीश मेडियम स्कूल भ ता चव्हाण म मा विद्यालय चौके सौ हि भा वरसकर विद्या मंदिर वराड न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर श्री शिवाजी विद्या मंदिर काळसे श्री शांतादुगी विद्यामंदिर वडाचा पाट या शाळातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू अभिनंदन पत्र व बॅ नाथ पै यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. आकेरकर सर यानी कट्टा दशक्रोशीत १० वी प्रथम क्रमांक व १२ वी प्रथम क्रमांक विद्यार्थ्याना १००० रुपये पारितोषिक दिले.
बॅ नाथ पै सेवांगणच्या मधुकर भोलानाथ पाठारे पुरस्कार निधी रक्कम रु. ३०००
शुभम लक्ष्मण गावडे चौके व सिद्धी साबाजी राऊत वराड याना देण्यात आली.
या कार्यक्रमास अदिती शृंगारे बापू तळावडेकर मनोज काळसेकर संतोष गावडे भाऊ चव्हाण बाळा वराडकर सुनील चव्हाण परिसरातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.