राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) उद्या कुडाळला मेळावा

आमदार जितेंद्र आव्हाड करणार मार्गर्शन
निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा ११ जुलै रोजी सकाळी १०-३० वाजता कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे मेळावा, आयोजित केला असून या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री नामदार जितेंद्रजी आव्हाड हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत प्रथम जिल्हा कार्यकारिणी सभा होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व आजी माजी बेसिक पदाधिकाऱ्यांसह सेल, फ्रंटल,महिला संघटना युवती संघटना यांच्यासहित जिल्हृयातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पद नियुक्तीची नियुक्ती पत्रे नामदार.जितेद्र आव्हाड यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत,
राज्यात गेल्या आठवड्यापासून ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत,त्या अनुषंगाने ११ तारीखच्या या मेळाव्याला महत्व प्राप्त होणार असून शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी जशी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना व जनता खंबीर उभी राहिली तशाच प्रकारे यापुढेही संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व जिल्ह्यातील जनतेची साथ आदरणीय पवार साहेबांच्या विचाराबरोबर राहील,हे दर्शविण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह शरद पवार साहेब यांच्या विचारांशी सहमत असलेल्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,अर्चना घारे,सुरेश दळवी,नंदूशेठ घाटे,एम,के गावडे,प्रज्ञा परब,नम्रता कुबल, इत्यादी नेत्यांनी केले आहे,
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रांतीक सदस्य जिल्हा कार्यकारिणीसह तालुका अध्यक्ष शहरं अध्यक्ष,सर्व फ्रंटल,सेल, महिला, युवती संघटनांसह सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सदैव प्रेम असणारे,कोकणचे १००% फळबाग लागवडीचे भाग्यविधाते शरद पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत यावर शिक्कामोर्तब करून विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी ११ जुलैच्या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे,
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.