मळगांवात ‘शाळा कॅालेज ते शेतकरी बांध’ उपक्रम
माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते उद्धाटन
सहयोग ग्रामविकास मंडळ, गरडचे आयोजन
सावंतवाडी सहयोग ग्रामविकास मंडळ, गरड माजगाव व तालुक्यातील महाविद्यालये आणि माध्यमिक विद्यालयांच्या सहकार्याने मळगाव इंग्लिश स्कुल येथे ‘शाळा कॅालेज ते शेतकरी बांध’ उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्धाटन माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, सहयोग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर, मळगांव सरपंच स्नेहल जामदार, माजगांव सरपंच अर्चना सावंत, माजी सभापती राजू परब, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, अण्णा देसाई, श्री बिर्जे, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, मळगांव हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री. फाले, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, प्रवीण मांजरेकर आदी उपस्थित होते.
शेती पासून दूर जाणारा युवा वर्ग शेतीकडे वळावा, त्यांना शेतीविषयक आवड निर्माण व्हावी, शेतीतील नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी, शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मदत व्हावी आणि शाळा महाविद्यालयाना
समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या उपक्रमाअंतर्गत पाच ते आठ विद्यार्थ्यांचा गट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या गरजेप्रमाणे शेतीविषयक कामात त्यांना मदत करणार आहे. तसेच गरज भासल्यास तज्ज्ञ मार्गदर्शक शेतकऱ्यांना व मुलांना शेतीविषयक मार्गदर्शन करणार आहेत,अशी माहिती यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर यांनी दिली.