पाट हायस्कूलचा आदित्य नाईक फेरतपासणीत कुडाळ तालुक्यात पहिला आणि जिल्ह्यात चौथा

कोणत्याही एक्सट्रा क्लासशिवाय उज्ज्वल यश

प्रतिनिधी । कुडाळ : एस .के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस, एल .देसाई विद्यालय व कै.सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ.विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालयाचा कुमार. आदित्य रमाकांत नाईकने सन 2022- 23 इयत्ता दहावीच्या परीक्षेत फेरतपासणी निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथा व कुडाळ तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे .
इंग्रजी या विषयामध्ये आदित्य रमाकांत नाईकला सुरुवातीला 89 गुण मिळाले होते .नंतर फेरतपासणी 97 गुण मिळाले असून आठ गुणांची वाढ झाली आहे. सुरुवातीला 489 /500 पैकी 97.80% गुण मिळाले होते. आता फेरतपासणीमुळे 494/ 500 पैकी 98.80% गुण प्राप्त झाले आहेत. हे उज्वल यश त्याने कोणताही क्लास न करता मिळविले आहे ही विशेष बाब आहे.
त्याच्या या यशाबद्दल संस्था कार्याध्यक्ष समाधान परब ,उपाध्यक्ष दिगंबर सामंत, सचिव सुधीर ठाकूर,खजिनदार देवदत्त साळगावकर तसेच सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक .शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ, पालक या सर्वांनी त्याचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!