पाट कनिष्ठ महाविद्यालयात एम्.एल्.टी. च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

निलेश जोशी । कुडाळ : एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट, पंचक्रोशी संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय पाट व कै. सौ. एस्. आर् . पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालयात एम्. एल्. टी .च्या (मेडिकल लॅबोरटरी टेक्निशियन) विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ शनिवार दिनांक १ जुलै 2023 रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक शामराव कोरे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कनिष्ठ महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक एम् . एल्. टिक्का सर यांनी भूषविले. विद्यार्थ्यांनो, मेहनतीने व प्रामाणिकपणे आपली व्यावसायिक जबाबदारी पार पाडा .आपल्या ज्ञानाचा सुयोग्य वापर करा. पॅरामेडिकलच्या या क्षेत्रातील उच्च शिक्षणाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल घडवा असा संदेश त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला.
यावेळी एम. एल. टी .विभागाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक विजय मेस्त्री सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेने सुरू केलेल्या या एक वर्षाच्या पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे महत्त्व त्यांनी विशद केले. यावेळी एम .एल. टी. च्या विद्यार्थीनी कुमारी. रंजना गोसावी व कुमारी .कोमल सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माध्यमिक विभागाच्या वतीने संदीप साळसकर सर यांनी शुभेच्छा दिल्या.
या शुभेच्छा समारंभासाठी संस्थेचे उपाध्यक्ष दिगंबर सामंत सर, कार्याध्यक्ष समाधान परब, संस्था पदाधिकारी राजेश सामंत, देवदत्त साळगावकर, कै.डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शुभांगी साळसकर मॅडम,एम .एल. टी .च्या मार्गदर्शिका मेस्त्री मॅडम, एम. एल. टी. चे विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .शीला सामंत यांनी केले.तर शिक्षक प्रतिनिधी श्री. गुरुनाथ केरकर यांनी आभार मानले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.





