सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा पिल्लाई इन्स्टिट्यूट सोबत सामंजस्य करार

नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व महाविद्यालयांना इतर संस्थांशी जोडले राहणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांना अधिकाधिक चौफेर ज्ञान मिळवून देण्याच्या दृष्टीने मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थां सोबत विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने पनवेल येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लाई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सोबत Memorandum of Understanding म्हणजेच सामंजस्य करार केलेला आहे. हा करार पुढील तीन वर्षांसाठी लागू असणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अध्ययन अध्यापनाच्या विविध नाविन्यपूर्ण संधी होणार आहेत. यामध्ये सिमुलेशन गेम्स वर्कशॉप, कम्युनिकेशन स्किल्स वर्कशॉप, एक्सपर्ट सेशन्स, गेस्ट लेक्चर्स, सेमिनार, ट्रेनिंग सेशन इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे.
हा सामंजस्य करार म्हणजे महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगती मधील एक मोठे पाऊल आहे, असे मत प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर यांनी व्यक्त केले. इन्स्टिट्यूट च्या प्राचार्यांच्या वतीने प्राध्यापक अभिमन्यू रॉय यांनी तसेच सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉक्टर ठाकूर यांनी करारावर सह्या केल्या. यावेळी आयक्यूएसी कोऑर्डिनेटर डॉक्टर सुमेधा नाईक, डॉक्टर उज्वला सामंत आणि महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री कैलास साळुंखे हे उपस्थित होते.

मालवण प्रतिनिधी

error: Content is protected !!