श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने संविता आश्रमाला १०१ खुर्च्या प्रदान

प्रतिनिधी । कुडाळ : श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर या संस्थेला काल गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून १०१ खुर्च्या देण्यात आल्या.
संविता आश्रम पणदूर ही संस्था केली अनेक वर्ष अपंग व निराधार बांधवांची सेवा करून त्यांना आसरा देण्याचे काम करत आहे. या संस्थेच्या इमारतीमधील सभागृहात वर्षभर अनेक कार्यक्रम साजरे होत असतात. आश्रमात राहणाऱ्या सर्वच लोकांना या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांची बसण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून १०१ खुर्च्या प्रदान करण्यात आल्या. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजीत देसाई, अविनाश वालावलकर, केदार सामंत, अभय सामंत, सर्वेश वर्दम, कमलेश पाटकर यांनी या खुर्च्या प्रदान केल्या. संस्थेच्या वतीने स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे आभार मानण्यात आले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!