कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांची देवगड मध्ये बदली
कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात जिल्ह्यातील सर्वात मोठा ध्वज स्तंभ उभारणीत महत्वाचे योगदान
गेले साडेतीन वर्ष कणकवली तहसीलदार पदावर होते कार्यरत
गेली साडेतीन वर्ष कणकवली तहसीलदार या पदावर कार्यरत असणारे कणकवलीचे तालुक्याचे तहसीलदार आर. जे. पवार यांची देवगड येथे बदली झाली आहे. या देवगड तालुक्यातुनच त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात केली. त्या देवगडमध्ये त्यांची सेवानिवृत्तीच्या काही वर्षांच्या टप्प्यात बदली झाली. कणकवली तालुक्यात देखील त्यांनी तलाठी पदावर काम केले. त्यानंतर कणकवली तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार या पदावरही श्री पवार यांनी काम केले. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात जिल्ह्यातील सर्वात मोठा ध्वजस्तंभाची उभारणी करणे, तसेच तहसीलदार कार्यालयाचा परिसर सुशोभीकरण व नेटका करणे अशी अनेक लोकाभिमुख कामे श्री पवार यांनी मार्गी लावली. सर्वच सामाजिक उपक्रमांमध्ये ते सक्रिय सहभागी असत. श्री पवार यांचे कणकवली तालुक्यातील सर्वच पक्षीयांशी स्नेहाचे संबंध होते. व यातून जनतेची कामे मार्गी लावण्यावर त्यांचा नेहमीच भर असे. जनतेला थेट भेटणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली