अमित यादव कणकवली चे नवीन पोलीस निरीक्षक
कणकवली पोलीस निरीक्षक पदाचा संगीत खुर्चीचा खेळ सुरूच
नवीन पोलीस निरीक्षकां समोर गुन्ह्याच्या तपासाची अनेक आव्हाने
कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांची बदली झाल्या नंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागी वैभववाडी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अमित आनंदराव यादव यांना बदलीने पथस्थापना देण्यात आली आहे. पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदाचा संगीत खुर्चीचा खेळ गेले काही वर्षे सातत्याने सुरू असून, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यानंतर काही काळ सचिन हुंदळेकर या दोन पोलीस निरीक्षकांचा कार्यकाळ काही महिने स्थिरस्थावर होतो तोपर्यंत त्यांच्या बदल्या केल्या गेल्या. त्यानंतर आलेले पोलीस निरीक्षक हे जास्त काळ या पदावर राहीले नाहीत. त्यामुळे कोणत्याही क्षणी बदली होण्याच्या मानसिकतेतूनच कणकवली पोलीस निरीक्षक म्हणून हजार होणारे पोलिस अधिकारी काम करत असतात. त्यामुळे आता तरी निदान अमित यादव यांच्या नियुक्तीने निदान तीन वर्षांच्या काळाकरिता कणकवलीला कायमस्वरूपी पोलीस निरीक्षक मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली