पोलीस पाटील शासन पोलीस खात्याचा माहितीची देवाणघेवाण करणारा महत्वाचा दुवा– स.पो नि व्हटकर

आचरा–अर्जुन बापर्डेकर
पोलीस पाटील हे शासन आणि पोलीस खात्याचा खालच्या टप्प्यातील माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी एक महत्वाचा दुवा असून गावातील एखादी संवेदनशील माहिती शासना पर्यत पोहोचविण्याचे कार्य ते करत असतात असे मत आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी बेळणे येथे व्यक्त केले.
चंदगड जि. कोल्हापूर येथील पोवाची वाडी मधील पोलीस पाटलाचा झालेल्या खून प्रकरणाच्या अनुषंगाने बुधवारी दुपारी बेळणे चेक पोस्ट आचरा येथे आचरा पोलिस ठाणे अंतर्गत सर्व पोलीस पाटील यांची संयुक्तिकरित्या बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित पोलीस पाटीलांना ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत आचरा पोलीस स्टेशन चे पोलीस अंमलदार अक्षय धेंडे व अनिकेत सावंत यांसह आचरा पोलीसस्टेशन हद्दीतील सर्व पोलीसपाटील उपस्थित होते.
यावेळी पोलीस पाटील हे गावातील एखादी संवेदनशील माहितीची देवाणघेवाण करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी व पोलीस ठाणे कडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात चर्चा करून सर्व पोलीस पाटलांचे चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मनोबल वाढवण्यात आले. तसेच हिवाळे गावचे पोलीस पाटील विरेंद्र कदम हे कायमस्वरूपी सतर्क राहून पोलीस ठाणेस त्वरित माहिती देत असल्याकारणाने गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न झाल्याने त्यांचा आचरा पोलीस ठाणे मार्फत सत्कार करण्यात आला. या वेळी गोठणे पोलीस पाटील महेंद्र तळवडेकर व असगनी पोलीस पाटील आनंद तांबे यांनी पोलीस पाटील म्हणून गावात कामकरीत असताना गावांमध्ये त्यांना निर्माण होणाऱ्या अडीअडचणींबाबत प्रभारी अधिकारी अनिल व्हटकर यांच्या सोबत मनमोकळेपणाने चर्चा केली पोलीस पाटील यांना आचरा पोलीस ठाणे येथे येण्याकरिता होणारा गाडी खर्च लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी व्हटकर यांनी बेळणे आऊट पोस्ट मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी मीटिंग घेण्याबाबत येईल असे सांगितले तसेच पोलीस ठाण्यातील नेमणुकीतील अधिकारी व अंमलदार यांच्याकडून गाव भेटी दरम्यान पोलीस पाटील यांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल ग्रामस्थांसमोर सत्कार करून त्यांचा मानसन्मान वाढवण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले.




