महामार्गाच्या ढिम्म अधिकाऱ्यांना आमदार राणेंकडून कानपिचक्या!

कणकवली तहसीलदार कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन बैठक

मतदार संघातील जनतेला त्रास होता नये यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क रहा

आम्ही राज्यकर्ते शासन आणि प्रशासनातील अधिकारी हे लोकशाहीची दोन चाके आहेत. आपण जनतेचे सेवक आहोत या भावनेने काम करा.100 टक्के प्रश्न सोडवू शकला नाही तरी किमान 80 टक्के प्रयत्न केलात तरी जनता तुम्हाला आशीर्वाद देईल. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर मंत्रालयीन पातळीवर आवश्यकता भासल्यास मला फोन करा. परंतु या पावसाळ्यात आपल्या मतदारसंघातील जनतेला नैसर्गिक आपत्तीत त्रास होत नये याची दक्षता घ्या अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कणकवली देवगड वैभववाडी तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली तहसीलदार कार्यलयात झाली. यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते. या बैठकीला कणकवली तहसीलदार रमेश पवार, वैभववाडी तहसीलदार देसाई, महावितरण कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग अभियंता श्रीनिवासन, एसटी, आरोग्य जिल्हा परिषद बांधकाम, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.करूळ घटरस्त्याच्या दुरवस्थे वरून अभियंता श्रीनिवासन याना आमदार नितेश राणे यांनी धारेवर धरले. तुम्हाला खडे बोल ऐकायची सवय पडलीय. आणि आम्हाला बोलायचा कंटाळा आलाय. अशा शब्दांत आमदार राणेंनी आपली नाराजी बोलून दाखवली. कणकवली शहरातील उड्डाणपुलावरून सर्व्हिस रोडवर धबधब्यासारखे कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावरून ही ठेकेदार दिलीप बिल्डकाँन च्या अधिकाऱ्यांना समज दिली.एकंदरीत आजच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत कणकवली विधानसभा मतदारसंघात जनतेला कोणताही त्रास पावसाळ्यात होऊ नये याबाबत दक्षता घेण्याची सूचना आमदार नितेश राणे यांनी केल्या.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!