कणकवलीत कॉलेज रोडवर झाड पडून वाहतूक ठप्प

नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची घटनास्थळी धाव
कणकवलीत आज वादळी वाऱ्यांसह सुरू झालेल्या पावसामुळे कॉलेज रोडवर लक्ष्मी विष्णू हॉल समोर गुलमोहराचे झाड रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प झाली. याबाबत माहिती मिळतात कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी देखील घटनास्थळी घाव घेतली. व झाड हटवण्याकरिता मदतकार्य केले. यावेळी नगरपंचायत कर्मचारी मनोज धुमाळे, मिथुन ठाणेकर, भरत उबाळे यांच्या सह स्थानिक नागरिक ही उपस्थित होते. हे झाड हटवण्याचे काम सुरू आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





