नीट 2023 परीक्षेमध्ये संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी चे घवघवीत यश

जयसिंगपूरः नीट परीक्षेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संजय घोडावत अकॅडमी ने घवघवीत यश संपादित करत यशाची परंपरा कायम राखली.
अकॅडमीच्या वैष्णवी मोरे 720 पैकी 690, श्रृतम दोशी 686, आस्था शिराळे 670, शुभम पाटील 665, शिवानी साळुंखे 662, इरा शेंडगे व रिया राठी 660, रजत देशपांडे 654,साक्षी चौगुले 651,या विद्यार्थ्यांनी 650 पेक्षा अधिक गुण मिळविले.
अकॅडमीच्या 1 विद्यार्थ्याने 690,तिघांनी 670, नऊ विद्यार्थ्यांनी 650,31 विद्यार्थ्यांनी 600,78 विद्यार्थ्यांनी 550 व 121 विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा अधिक गुण मिळवत यश संपादन केले.
अकॅडमी चे संचालक वासू सर व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी यशस्वी विद्यार्थी,पालक, विश्वस्त विनायक भोसले व संचालक वासू सर यांचे अभिनंदन केले आहे.





