‘शिवगर्जना मित्र मंडळ नडगिवे’ यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अतिशय मनःपूर्वक व कष्टपूर्वक ज्ञानार्जन करून जीवनामध्ये यशस्वी व्हावे. प्राथमिक शिक्षण हा विकासाचा पाया आहे.तो मजबूत होण्यासाठी विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी व शिक्षण प्रेमी व्यक्तीनी परस्परांच्या समन्वयातून हे उद्दिष्ट साध्य करायला हवे .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे ज्ञान देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचायला हवा .विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून द्यायला हवे. असे मनोगत ‘शिवगर्जना मित्र मंडळ नडगिवे’ तर्फे आयोजित शैक्षणिक साहित्य वितरण व गुणवंत विद्यार्थी कौतुक समारंभाच्या सोहळ्यात माजी वित्त व बांधकाम सभापती मान. श्री रवींद्रजी जठार साहेब यांनी व्यक्त केले.
९’व्या’आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शिवगर्जना मित्र मंडळ नडगिवे यांच्या संकल्पनेतून नडगिवे व वायंगणी गावातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना, अंगणवाडीच्या बालकांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप तसेच माध्यमिक शालांत परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा; जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ या शाळेत संपन्न झाला.
या प्रसंंगी नडगिवे गावच्या सन्मा. सरपंच सौ. माधवी मण्यार यांनी शिवगर्जना मित्र मंडळाचे कौतुक केले. त्याग,सेवा व समर्पण या ब्रीद वाक्याला साजेसे कार्य हे मित्रमंडळ करत आहे. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे.तसेच विद्यार्थ्यांनी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये अव्वल रहावे .अशा गोड सदिच्छा आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.
माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे साहेबांनी’ शिवगर्जना मंडळावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला. वर्षभरात या मित्रमंडळाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. गावाच्या शैक्षणिक विकासासाठी ते प्रयत्नपूर्वक काम करत आहेत. याचा मला आनंद होतोय. असे शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
मा. केंद्रप्रमुख, सद्गुरु कुबल साहेब यांनी गर्जना मित्र मंडळाचे विशेष अभिनंदन केले. अनुभवाच्या शिदोरीवर आपण तालुका,जिल्हा व राज्यस्तरावर या मंडळाचा आदर्श ठेवावा सर्वांसमोर ठेवावा.असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी नडगिवे उपसरपंच मा.श्री.भूषण कांबळे,ग्रामपंचायत सदस्य-श्री.प्रशांत धावडे,श्री.दर्शन गुंडये,श्रीम.लता हिवळकर,श्रीम.मयुरी कर्ले,माजी सरपंच श्री.अमित मांजरेकर, माजी उपसरपंच श्री. भावेश कर्ले,शिवगर्जना मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.अमित सावंत, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्री.दिलीप मण्यार,मा.सतीश कर्ले-व्य.स.अध्यक्ष,मा.श्री.सुनिल कर्ले,मा.श्री.सुधीर मेस्त्री,मा.श्रीम.प्रेरणा अंगवलकर,मा.श्रीधर मण्यार, गांगेश्वर सेवा मंडळ अध्यक्ष- श्री गुरुनाथ मेस्त्री,मा.संजय मुद्रस-प्रमुख सल्लागार,मा.श्री.किशोर मुद्रस,मा.श्री.प्रमोद मुद्रस,मा.बाळा मण्यार,नडगिवे शाळा मुख्याध्यापिका श्रीम.अनिता पाटकर,मा.डोंगळे मॅडम,मा.प्रभा अकिवाटे,मा.शितल कासले (शिक्षक)तसेच शिवगर्जना मित्र मंडळाचे कार्यकर्ते श्री. विनायक मण्यार, श्री. दीपक मण्यार, श्री.यश पाटील,श्री. संतोष मण्यार,श्री. सचिन तळेकर,श्री.अभिषेक गुंडये,श्री. प्रणय धुरी,श्री.गुरु कर्ले,प्रदीप मण्यार ,अंगणवाडी सेविका,पालक,ग्रामस्थ,विद्यार्थी बहुसंख्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल तुपविहीरे तर आभार संदीप कदम यांनी मानले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण