“सेवा सहयोग फाऊंडेशन (ठाणे) मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गव्हाणे ग्रामविकास मंडळ (मुंबई) यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा कुरंगवणे (खैराट) मधील विद्यार्थ्यांना “सेवा सहयोग फाऊंडेशन (ठाणे) यांच्यामार्फत “शैक्षणिक संच” (स्कुल बॅग व इतर शैक्षणिक साहित्य) वाटप कार्यक्रम रविवार दिनांक १८ जून २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा कुरंगवणे (खैराट) या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी “सेवा सहयोग फाऊंडेशन (ठाणे) तर्फे बहुमूल्य असं शैक्षणिक साहित्य मुलांना देण्यात आलं. सदर शैक्षणिक संच वाटप कार्यक्रम जि प. पुर्ण प्राथमिक शाळा कुरंगवणे खैराट चे मुख्याध्यापक श्री. बागडी सर, सहकारी शिक्षक वावदाने सर आणि कासार सर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कुरंगवणे मधील मुंबई स्थित काही ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व इतर शाळा समिती सदस्य, तसेच सर्व पालक वर्ग, स्थानिक ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री बागडी सर यांनी “सेवा सहयोग फाऊंडेशन (ठाणे) तर्फे पुरवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचं वाटप करत असताना सेवा सहयोग फाउंडेशन या संस्थेकडून कोकणसह प. महाराष्ट्र मधील डोंगराळ व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी कायम भरीव मदत करत असलेल्या त्यांच्या कार्याचं कौतुक केलं, तसेच सहकारी शिक्षक श्री वावदाने सर यांनी “सेवा सहयोग फाऊंडेशन (ठाणे)” तर्फे वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल त्यांच्या कार्याची प्रशंसा करून सेवा सहयोग फाउंडेशन (ठाणे) च्या सर्व संचालकांचे मन:पुर्वक आभार मानले व त्यांना पुढील कारकिर्दी साठी शुभेच्छा दिल्या, आणि कार्यक्रमाच्या शेवटी श्री कासार सर यांनी विद्यार्थ्यांना या सेवा सहयोग फाउंडेशन (ठाणे) तर्फे वितरीत करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचं महत्व पटवून देत मार्गदर्शन केले तसेच या फाउंडेशन मार्फत केंद्रशाळा शेर्पे व जि. प.शाळा गुंजवणे (पतयान वाडी) येथे देखील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली……!
अस्मिता गिडाळे, खारेपाटण