जि.प.मसुरे नं.१ केंद्रशाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

माझी विद्यार्थिनी सौ सुषमा सावंत निगडे देशमुख यांचा अनोखा उपक्रम

जीवनामध्ये अनेकांचे ऋण आपल्यावर असतात .त्या ऋणातून मुक्त होणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून आपली मातृशाळा मसुरे नं.१ या शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता शाळेची माजी विद्यार्थीनी सौ.सुषमा सावंत/निगडे-देशमुख यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मसुरे नं.१ प्रशालेतील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले.
सदर शैक्षणिक साहित्य पूनम सावंत प्रभाग अध्यक्ष ठाणे मनसे,श्री.सुरेश चव्हाण ,संध्या ग.परब(माटेकर)यांनी मुख्या.सौ.शर्वरी सावंत यांना सुपुर्द केले. या वेळी बोलताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत म्हणाल्या सुषमा सावंत निगडे देशमुख या प्रशालेच्या माजी विद्यार्थीनी असून आज त्यांनी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध केले असून मिळालेल्या या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी योग्य तो लाभ घेऊन आपली शैक्षणिक उन्नती साधावी. मसुरे गावच्या माजी सरपंच सौ लक्ष्मी पेडणेकर यांनी बोलताना सांगितले की सुषमा सावंत यांचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे. आपल्या गावामध्ये, आपल्या प्रशालेमध्ये शैक्षणिक उन्नती साधावी त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी केलेला हा उपक्रम दिशादर्शक आहे.
सदर साहित्य संध्या परब यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत वह्या, छत्री, दप्तर आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
यावेळी शा.व्य.समिती अध्यक्ष श्री.सन्मेश मसुरेकर,माजी सरपंच सौ.लक्ष्मी पेडणेकर,मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत,श्री.विनोद सातार्डेकर सर,श्री.गोपाळ गावडे सर,सौ.रामेश्वरी मगर मँडम,शैलेश ठाकुर,संतोष नार्वेकर,नंदादीपक साटम,हरिश्चंद्र दुखंडे,मृणाल परब,दीक्षा दुखंडे,शामल आईर,आसावरी ठाकुर,नमिता तोंडवळकर,सायली दुखंडे,हेमलता दुखंडे,लक्ष्मण शिंगरे,लावण्या शिंगरे,स्वरा नार्वेकर आदी मान्यवर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

मसुरे प्रतिनिधी

error: Content is protected !!