चिंदर येथील जेष्ठ शिवसैनिक सुरेश(बाबू) वळंजू यांचे निधन..!

चिंदर येथील जेष्ठ शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक सुरेश (बाबू) वळंजू यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने रात्री निधन झाले. आज सकाळी चिंदर नागोचीवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. ते 56 वर्षाचे होते. पडत्याकाळात आचरा विभागात शिवसेनेला उभारी देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजया, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने आचरा परिसरात दुखः व्यक्त करण्यात येत आहे.
आचरा । प्रतिनिधी