न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे मिटवल्यास वेळ व पैसा वाचेल!

कणकवली दिवाणी न्यायाधीश टी. एच. शेख यांचे प्रतिपादन

कणकवली न्यायालयात मध्यस्थी जागृती शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

न्यायालया जवळ आलेले प्रकरण जे मिटवता येऊ शकते हे प्रकरण मध्यस्त्या मार्फत मिटवली गेले पाहिजे. वाटपाचे दावे किंवा अन्य कोणतीही प्रकरणे मिटवल्यामुळे वेळ व पैसा वाचतो त्याच बरोबर पदरी पडत असणारी अवहेलना देखील टळते असे उद्गार कणकवली न्यायालयाचे न्यायाधीश टी. एच. शेख यांनी काढले. कणकवली तालुका विधी सेवा समिती व कणकवली वकील संघटना यांच्या वतीने कणकवली न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या मध्यस्थी जागृती कार्यक्रमात कणकवली न्यायाधीश टी एच शेख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सह दिवाणी न्यायाधीश एम बी सोनटक्के, सरकारी अभियोक्ता जी. आर. माजगावकर, ऍड.मिलींद सावंत, ऍड.निकिता म्हापणकर, ऍड.भूषण बिसुरे, ऍड.भालचंद्र पाटील,ऍड. संदीप राणे, सहाय्यक अधीक्षक, सुशांत परब, सहाय्यक अधीक्षक शरयू पाटील, आदि उपस्थित होते. यावेळी घरगुती हिंसाचार ची प्रकरणे व त्यावर मध्यस्थ्यामार्फत करण्यात येणारी तडजोड याबाबत निकिता म्हापणकर यांनी मार्गदर्शन केले. तर लोक अदालत व लोक न्यायालयांतर्गत प्रकरणांवर करण्यात येणाऱ्या तडजोडीबाबत ऍड मिलिंद सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेख यांनी एकूणच मध्यस्थी जागृत ही कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करत मध्यस्थ्यामार्फत तडजोड करून पैसा वेळ व अवहेलना देखील टाळा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. मिलिंद सावंत यांनी केले.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!