कनेडी राड्यातील गुन्हा दाखल असलेल्या संजना सावंत यांच्यासह अन्य संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर

307 व 353 या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

संशयितांच्या वतीने ऍड. संग्राम देसाई, ऍड. सुहास साटम यांचा युक्तिवाद

कनेडी येथील राड्यात दोन वेगवेगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संजना संदेश सावंत, यांच्यासह संशयित आरोपीना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. संशयितांच्या वतीने ऍड. संग्राम देसाई, ऍड. सुहास साटम यांनी काम पाहिले. याबाबत कनेडी बाजारपेठ येथे कुणाल सावंत व गोट्या सावंत यांच्यात 24 जानेवारी रोजी वाद झाले होते. या वादामुळे तिथे भाजपा व शिवसेना या दोन्ही बाजूचे काही लोक जमा झाले होते. यात शिवसेना व भाजप दोन्ही बाजूचे लोक हातात दांडे घेऊन एकमेकांवर चाल करून गेले. यावेळी झालेल्या झटापटीत फिर्यादी राजेंद्र नानचे, व अन्य पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. तसेच यावेळी संशयितांनी पोलिसांना येथूननिघून जा अन्यथा दगडफेक करून जाळपोळ करून ही धमकी दिली अशी फिर्याद राजेंद्र नानचे यांनी दिली. त्यानुसार संशयित आरोपींच्या विरोधात भा.द. वी 353, 332, 143, 147, 148, 149, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाबत संशयित आरोपी संजना सावंत, सागर सावंत, रमेश म्हापनकर, स्वप्निल चिंदरकर,संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, यांनी वकिलांच्या वतीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर याच कनेडी येथील राड्यात सूर्यकांत विष्णू तावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी म्हणून सागर सावंत, संजना सावंत, सुनील सावंत, संजय सावंत, अशोक कांबळे, मिलिंद मेस्त्री, सर्वेश दळवी, स्वप्नील चिंदरकर, प्रफुल्ल काणेकर, किशोर परब, संजय सावंत, धोंडी वाळके, शुभम सावंत, प्रदीप कांबळे, दत्ताराम गावकर यांच्यावर भा. द. वि कलम 307, 323, 324, 143, 147, 148, 149, 403, 504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संशयित आरोपींच्या वतीने वकिला मार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना सशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. संग्राम देसाई, व ऍड. सुहास साटम यांनी काम पाहिले.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!