आचरेत बॅ. नाथ पै सेवांगण मालवण आणि सानेगुरुजी कथामाला मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य साने गुरुजी यांची ७३वी पुण्यतिथी साजरी

केंद्रशाळा आचरे नं१ च्या स्व.वसंतराव आचरेकर रंगमंचावर पूज्य साने गुरुजी यांची ७३वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्तपणे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास घाडीगावकर (मुख्या, आचरे नं१) हे होते. तर सुगंधा गुरव(केंद्रप्रमुख आचरे), संजय आचरेकर( सेवांगण मालवण), स्मिता जोशी( चिंदर नं१), श्रुती गोगटे ( वायंगणी मालवण), पांडुरंग कोचरेकर(तोंडवळी), रामचंद्र कुबल(आचरे पिरावाडी) आदी मान्यवर ऊपस्थितीत होते. समारंभाचे ऊद्घाटन सुरेश ठाकूर(अध्यक्ष, सानेगुरुजी कथामाला मालवण आणि कार्योपाध्यक्ष नाथ पै सेवांगण मालवण) यांचे हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले. बॕ.नाथ पै सेवांगण मालवण च्या वतीने आचरे प्रभागातील गरीब आणि होतकरु अशा ५वी ते १२ वी पर्यंतच्या २७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक निधिचे वाटप सेवांगणच्या वतीने करण्यात आले. सुरेश ठाकूर आणि संजय आचरेकर यानी सेवांगण च्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहीती दीली, तर सुगंधा गुरव, स्मिता जोशी, श्रुती गोगटे आणि विकास घाडीगावकर आदीनी पूज्य . साने गुरुजीच्या जीवनाविषयी उपस्थितांना माहिती सांगितली.
आचरे प्रभागातील बहुसंख्य विद्यार्थी आणि पालक ऊपस्थितीत होते. सदर कार्यक्रमाला कामिनी ढेकणे, भावाना मुणगेकर, ऊदय रोगे, बागवे यांच्यासह अनेक मान्यवर ऊपस्थितीत होते. कार्यक्रमाचे पूर्व नियोजन पांडुरंग कोचरेकर यांनी केले. तर व्यवस्थापन रामचंद्र कुबल यांनी केले. प्रास्तविक आणि आभारप्रदर्शन पांडुरंग कोचरेकर यानी केले. तर सूत्रसंचलन गुरुनाथ ताम्हणकर यानी केले.

error: Content is protected !!