कणकवली तालुक्यातील जुगार मटका व अवैध धंदे तात्काळ बंद करा

शिवसेना ठाकरे गटाची प्र. डीवायएसपी किशोर सावंत यांच्याकडे मागणी

प्र. डीवायएसपी किशोर सावंत यांचे ठाकरे गटाकडून स्वागत

कणकवलीचे प्रभारी डी वाय एस पी किशोर सावंत यांचे शिवसेना उद्धव ठाकरे गटा तर्फे स्वागत करण्यात आले.
कणकवली तालुक्यात निपक्षपाती पणे कारभार चालवावं तसेच जुगार, मटका ऑनलाइन कॅसिनो, गोवा दारू विक्री व गांजा विक्री यासारखे कणकवलीत तालुक्यात चालणारे अवैध धंदे यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत , युवासेना समन्वयक राजू राठोड , महिला प्रतिनिधी सौ माधवी दळवी , आवसारे , महेश कोदे, निलेश सावंत, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!