कणकवलीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मान्सून ची अद्याप प्रतिक्षा
कणकवली शहरात सकाळी पाच ते सहा च्या सुमारास मान्सून पूर्व पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर सकाळी 9 वाजल्या पासून पावसाचा शिडकावा झाला. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. भात पेरणी करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. केरळ मध्ये दाखल झालेल्या पाऊस हा सिंधुदुर्ग पुढील दोन दिवसात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कणकवली प्रतिनिधी