वैभववाडी रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरणाचे काम मंजूर करा

आमदार नितेश राणे यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे मागणी

कणकवली मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यातील कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी हे रेल्वे स्टेशन अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनची सद्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून स्टेशन परिसर तसेच जोड रस्ते अत्यंत नादुरूस्त अवस्थेमध्ये असल्याने जनतेमध्ये व प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचे काम मंजूर करावे अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
या रेल्वे स्टेशनच्या इमारती तसेच परिसर व जोड रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने रेल्वे मंत्रालयाकडून निधी मंजूर करून घेणे जरूरीचे आहे. तरी आपण व्यक्तीशः याबाबत लक्ष घालून वैभववाडी रोड रेल्वे स्टेशन तसेच परिसराचे सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!