महिलेला मारहाण करत शिवीगाळ केल्या प्रकरणी नाटळ मधील दोघांना सशर्थ जामीन मंजूर

संशयित आरोपींच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद
नवीन घर बांधण्यासाठी साफसफाई करत असताना फिर्यादी महिलेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण करून सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या सूर्यकांत मारुती जाधव व पांडुरंग मारुती जाधव (दोन्ही राहणार नाटळ) यांची वैयक्तिक 25 हजाराच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपींच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला. याबाबत फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील दोघांना अटक करून कोर्टात हजर केले होते. 20 मे रोजी प्रकार घडला होता. त्यानंतर याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली होती.
फिर्यादी महिलेला संशयित 8 आरोपीनी शिवीगाळ करत मारहाण केल्या ची तक्रार दाखल केल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी न्यायालयाने सशर्थ जमीन मंजूर करत असताना तपास कामाला सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत संशयितानी नाटळ गावात प्रवेश न करणे या अटींवर जमीन मंजूर करण्यात आला. संशयित आरोपींच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.
दिगंबर वालावलकर /कणकवली





