संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश

सावंतवाडी प्रतिनिधि
मार्च 2023 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये (S.S.C)संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला.
प्रथम क्रमांक-कु.समर्थ दत्तात्रय भिसे 90%
द्वितीय क्रमांक – कु. रघुनाथ गोविंद मठकर 89%
तृतीय क्रमांक – कु. दिव्यांक केशव परब 86.80%
सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांनी शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे संस्थापक डॉ.शेखर जैन सर,कमिटी सदस्या जयाभारती मॅडम,प्रशालेचे मुख्याध्यापक हेमंत तानावडे सर ,सर्व विषय शिक्षक व पालक व माजी मुख्याध्यापक गजानन पालयेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले होते.
संस्थाध्यक्ष डॉ. शेखर जैन सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, कमिटी सदस्य,मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,सर्व विषय शिक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक व अभिनंदन केले.





