सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे वतीने यु.पी.एस.सी.परीक्षेत यश संपादन केलेल्या तुषार पवार चा सत्कार करण्यात आला.संतोष हिवाळेकर पोईप

       नांदोस गावचा सुपुत्र असणारा तुषार दीपक पवार याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ८६१ वी रँक प्राप्त करून उज्ज्वल यश संपादन केले.याबद्दल त्याचे सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळचे वतीने नांदोस ता.मालवण येथे हृद्य सत्कार करण्यात आला.
        तुषार पवार च्या रूपाने सिधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झालेच पण त्याबरोबरीने चर्मकार समाजाचेही नाव उज्जवल झाले,अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.
  यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे,माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण व नंदन वेंगुर्लेकर,जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर माणगावकर,मालवण तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण,नांदोस सरपंच माधुरी चव्हाण,सल्लागार वसंत चव्हाण,बाळकृष्ण माणगावकर,रवींद्र नांदोसकर,अरुण कुणकवळेकर,रामदास कुणकवळेकर,दीपक पवार,सौ.पवार,दिलीप चव्हाण,अमित चव्हाण,रोशन जाधव,विजय चव्हाण,विजयश्री चव्हाण,यशवंत चव्हाण आदी उपस्थित होते.
     यावेळी तुषार पवार यांचेबद्दल सर्वश्री वसंत चव्हाण,हरेश चव्हाण,रवींद्र नांदोसकर,अरुण कुणकवळेकर,नंदन वेंगुर्लेकर,सुधाकर माणगावकर,प्रकाश चव्हाण,सुजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी तुषार पवार याने बोलताना आपल्या यशामागे आईवडील तसेच काही व्यक्तींचे हातभार आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.खडतर परिश्रम करूनच या यशापर्यंत पोचलो आहे.अजूनही प्रयत्नशील आहे असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार चंद्रसेन पाताडे यांनी केले. तर सूत्रसंचालन अमित चव्हाण यांनी केले.
error: Content is protected !!