युवासेना जिल्हाप्रमुखपदी सुकांत वरुणकर यांची नियुक्ती

खारेपाटण येथील उद्योजक सुकांत वरुणकर यांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत ,लोकसभा संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकी दरम्यान सुकांत वरुणकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, संदेश सावंत, सुनील पारकर, शेखर राणे, बबन शिंदे, किसन मांजरेकर आदी उपस्थित होते. आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नसलेले सुकांत यांनी आता राजकीय पटलावर पाऊल ठेवत शिसवेनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ केला आहे. शिवसेना संघटना वाढविणे आणि जनतेच्या हिताची कामे मुख्यमंत्री शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक आणि पक्षनेतृत्वाच्या माध्यमातून करणार असल्याचे यावेळी सुकांत वरुणकर यांनी सांगितले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण