कणकवली कॉलेज कणकवलीमध्ये व्यवसाय अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश

कणकवली/मयुर ठाकूर
•दहावी पास विद्यार्थ्यांसाठी कणकवली कॉलेज कणकवलीमध्ये व्यवसाय अभ्यासक्रमासाठी अनुदानित वर्गामध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
- यामध्ये शासनाच्या सर्व योजनाचा लाभदेखील मिळणार आहे
- बारावी बोर्ड परीक्षेनंतर बी.ए., बी.कॉम., हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग, एलएलबी इत्यादी सारख्या पदवीच्या कोणत्याही अभ्यासक्रमाकडे प्रवेश घेता येतो.
या अभ्यासक्रमानंतर स्वतःच्या व्यवसायाबरोबरच, शासकीय नोकरीमध्ये संधी उपलब्ध आहेत.
•नवीन शैक्षणिक धोरणानुसार, व्यवसाय अभ्यासक्रमाला विशेष महत्त्व येणार आहे. प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) गुण अधिक असल्याने विद्यार्थ्यांच्या मेरिटमध्ये मोठी वाढ होते व पुढील अभ्यासक्रमासाठी कुठेही प्रवेश घेता येतो. - प्रथम येणाऱ्याना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.
•मतिमंद, गतिमंद, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती उपलब्ध आहे.
प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधावा. कणकवली कॉलेज व्होकेशनल विभाग प्रा. हरीभाऊ भिसे प्रा. प्रमोद कोरगावकर सर , प्रा. जामदार सर यांच्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राचार्य युवराज महालिंगे यांनी केले आहे.
फोन 8432547667 9422633023