दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या कणकवलीतील गुणवंतांचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून सत्कार

विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या कणकवली शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते आज करण्यात आला. यामध्ये कणकवलीतील श्रावणी शिखरे, सृष्टी जोगळे यांनी 98 टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादी देण्याचा मान मिळवला. तसंच त्यांच्यासोबत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या स्वानंदी कोदे, आर्या डेगवेकर, यांचे देखील यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी हर्षद शिखरे, व त्यांचे कुटुंबीय तसेच माजी नगरसेवक राष्ट्रवादीचे नेते अबीद नाईक, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, रवींद्र गायकवाड, संजय कामतेकर, मेघा गांगण, बंडू गांगण, अभिजीत मुसळे, महेंद्र मुरकर, किशोर राणे आदि उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!