ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बॅनरवर जोडे मारो आंदोलन

कणकवली शिवसेनेच्या कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून निषेध
खासदार संजय राऊत यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच पत्रकार परिषदेमध्ये थुकण्याच्या केलेल्या प्रकाराचा निषेध सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. कणकवलीतील शिवसेना कार्यालयाजवळ खासदार संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी संजय राऊत यांचा निषेध देखील करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, संदेश पटेल, भास्कर राणे, निलेश तेली, सुनील पारकर, बाळू पारकर आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली