SSC निकाल । साळगाव हायस्कूल दहावीचा निकाल ९६.२२ टक्के

मधुकर तेंडोलकर प्रथम, तर श्रेया तामणेकर द्वितीय

प्रतिनिधी । कुडाळ : साळगाव येथील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.२२ लागला असून मधुकर विवेक तेंडोलकर हा ९३.२० टक्के गुण संपादन करून शाळेत पहिला आला आहे.तर श्रेया दिलीप तामाणेकर ९०.८०टक्के गुण संपादन करून द्वितीय आली आहे. रुचिरा सदानंद चव्हाण ८९.२०टक्के गुण संपादन करून तृतीय आली आहे.
एकूण ५३ विद्यार्थी या परीक्षेला बसले असून ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सलीम तकिलदार ,संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर,सचिव मुकुंद धुरी, मुख्याधिकारी सतीश साळगावकर ,नामदेव धुरी, ज्ञानदेव चव्हाण, रमाकांत धुरी,मोहन सावंत,सर्व पदाधिकारी ,शिक्षक,शिवसेने चे पदाधिकारी बबन बोभाटे व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!